यु ट्यूब’ वरून स्वर्गाची यात्रा तरुणीला भोवली ; झाली आयुष्याची अंत्ययात्रा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ब्लू व्हेल, सारख्या गेम मुळे काही दिवसांपूर्वी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता युट्युब वरून व्हिडीओ पाहून एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. मुंबई येथील भोईवाडा परिसरातील १५ वर्षीय मुलीने स्वर्गाची यात्रा करण्याच्या नादात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रावणी घोलप (वय १५) असे या मुलीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रावणीला सोशल मीडिया आणि यू ट्युबवरील व्हिडिओ बघण्याचे वेड होते. व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक करण्यात देखील तिला रस असे. श्रावणीने यू ट्युबवर शरीरातून आत्मा काढून स्वर्गाची यात्रा करून पुन्हा शरीरात येणे (astral travel) हा व्हिडिओ पाहिला. त्यानंतर तिनेही थेट स्वर्गात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, झालं काही तरी वेगळचं. यू ट्युबवरील ताऱ्यांच्या सफरीचा व्हिडिओ (astral travel) बघून त्याचे प्रात्यक्षिक आपल्या घरी करण्याच्या नादात श्रावणीला आपल्या जिवाला मुकावे लागले आहे.
काय आहे astral travel व्हिडीओ 
ताऱ्यांच्या सफरीचा हा व्हिडिओ असून, या व्हिडिओत तुमचा आत्मा स्वर्गाची सफर करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.  तसेच या व्हिडिओ नुसार तुमचा आत्मा शरीराबाहेर जाऊन कुठेही फिरू शकतो. भूतकाळात देखील जाऊ शकतो, तसेच मित्रांना देखील भेटू शकतो असा या व्हिडीओज दावा आहे. याच व्हिडिओने प्रभावित झालेल्या श्रावणीने तसा प्रयोग घरीच करण्याचा निर्णय घेतला. गेल्या गुरुवारी श्रावणीच्या वडिलांचा ४५ वाढदिवस असताना श्रावणीने बाथरूममध्ये फास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
गुरुवारी (१० जानेवारी) श्रावणीच्या वडिलांचा वाढदिवस होता आणि याच दिवशी श्रावणीचा मृत्यू झाल्याने भोईवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे कालपर्यंत हसत खेळत असलेल्या घोलप कुटुंबावर आज दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्याची लाडकी श्रावणी त्यांना सोडून गेली. या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, १० जानेवारीला श्रावणी आणि तिच्या आजीच भांडण झाल्याने तिने आत्महत्या केली.