क्रिकेटचा देव पून्हा एकदा मैदानात… 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील बिशप्स  स्कुलच्या मैदानावर आज पुन्हा एकदा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अवताराला. याठिकाणी येण्याचे निमित्त होते म्हणजे ‘तेंडुलकर मिडलेक्स ग्लोबल अकॅडमी’ च्या एक दिवसीय कार्यशाळेचे. आज बिशप्स स्कूलच्या मैदानावर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उदघाटन आणि नवोदितांना मार्गदर्शन करण्याकरिता साक्षात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यासह जगप्रसिद्ध प्रशिक्षक आज बिशप्स च्या मैदानावर हजर आहेत.

सचिनने पाळला शब्द…
क्रिकेटचा देव मनाला जाणाऱ्या सचिन ने एका वर्षांपूर्वी बिशप्स स्कुलच्या विद्यार्थ्यंशी १५ नोव्हेंबर २०१७ रोजी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारे एक बातचीत केली होती. आणि त्याच बातचितीवरून बरोबर एक वर्षांनी  १५ नोव्हेंबर २०१८ रोजी म्हणजे आजच्या दिवशी सचिन बिशप्स स्कुलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता हजार झाला. अशा पद्धतीने त्याने आपला शब्द पाळला.

उत्तम खेळाडू नाही तर उत्तम माणूस बना
यावेळी बोलताना सचिन तेंडुलकरने आपली ‘मन की बात ‘ शेअर केली. सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांनी दिलेली शिकवण त्यांनी यावेळी आवर्जून सांगितली. ते म्हणाले “माझ्या वडिलांनी मला नेहमीच एक शिकवण दिली आहे. ते म्हणायचे तू किती वर्षे क्रिकेट खेळणार ? २० वर्षे, ३० वर्षे ? पण एक गोष्ट लक्षात ठेव उत्तम खेळाडू बनण्याबरोबरच उत्तम माणूस असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. ते बनायला कधीच विसरू नको”  वडिलांची हीच शिकवण मी आजही लक्षात ठेवली आहे. या अकादमीत येणाऱ्या प्रत्येक क्रिकेटर मुला-मुलींना मी हीच शिकवण देईन” असे सचिन तेंडुलकर यांनी सांगितले. तसेच सध्या क्रिकेट मध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. खेळाचे नवे तंत्र येते आहे पण क्रिकेटचा जो पाया आहे. तो मजबूत असणे आवश्यक आहे. तोच पाया भक्कम करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेदरम्यान केला जाईल असे देखील सचिन म्हणाले.

‘तेंडुलकर मिडलेक्स ग्लोबल अकॅडमी’
खरेतर ‘मिडलेक्स ग्लोबल अकॅडमी’ इंग्लंड येथील नावाजलेली क्रिकेट अकॅडमी आहे. या अकॅडमीद्वारे नवोदितांना प्रशिक्षण दिले जाते. भारतात सचिन तेंडुलकर यांनी प्रतिनिधित्व करीत मिडलेक्स ग्लोबल अकॅडमी सोबत टाय अप करीत संपूर्ण भारतात तेंडुलकर मिडलेक्स ग्लोबल अकॅडमी द्वारा भारतभर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यांच्याद्वारे आज पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे याकरिता  मिडलेक्स ग्लोबल अकॅडमी कडून तज्ज्ञ प्रशिक्षकांना देखील बोलावण्यात आले आहे. हे प्रशिक्षक लेव्हल ३ आणि लेव्हल ४ चे प्रशिक्षक आहेत. यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन हे महत्वाचे मानले जाते.