श्रीमती गोमतीबाई तापडिया यांना ‘मातृत्व गाैरव’ पुरस्कार

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – कर्वेनगर माहेश्वरी परीवाराकडून दरवर्षी अन्नकुट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दि. १४ नोहेंबर रोजी भैरवनाथ मंदिर, कर्वेनगर येथे आयोजिक करण्यात आलेला अन्नकुट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्रीमती गोमतीबाई तापडिया यांना मातृत्व गाैरव पुरस्काराने गाैरविन्यात आले तर, श्री वल्लभदासजी डाळ्या यांना जीवन गाैरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी उद्योजक व माहेश्वरी समाजातील अग्रगण्य समाजसेवक श्री जुगलकिशोरजी मालु, श्री बालकिसनजी बजाज, डाॅ. रमेश हेडा, श्री जुगलजी पुंगलीया, महाराष्ट्र माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा पुष्पादिदि तोष्णीवाल, कर्वेनगर विभागाचे मा. नगरसेवक श्री राजाभाऊ बराटे व श्री शिवरामभाऊ मेंगडे यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष व सहकारी तसेच कर्वेनगर माहेश्वरी महिला मंडळांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर हनुमान काळ्या व मनिषा कर्नावट यांनी कार्यक्रमाची रुपरेषा केली.