‘या’ देशात सरकारच ठरवते बाळाचे नाव 

वृत्तसंस्था : अनेकदा एखाद्या दाम्पत्याला बाळ झाल्यानंतर त्याचं नाव ठेवण्याची जबाबदारी शक्यतो बाळाच्या आत्यावर म्हणजेच बाळाच्या वडिलांच्या बहिणीवर सोपवली जाते. अनेकांना आपले नाव आवडते तर काहींना आवडतही नाही. परिणामी त्यांना त्यांच्या नावावरून चिडवले जाते. त्यांचे नाव म्हणजे एक थट्टेचा विषय बनते. असा एक देश तुम्हाला माहित आहे का की जिथे बाळाचं नाव त्याची आत्या नाही तर सरकार ठेवते. होय हे खरे आहे. काही  देश असे आहेत जिथे बाळाचं नाव त्याची आत्या नाही तर चक्क सरकारच ठेवते. इतकेच नाही तर काही नावं अशी आहेत जे बाळास ठेवण्यास मनाई आहे. अशाच काही देशांबाबत आपण माहिती घेणार आहोत.

डेन्मार्क- या देशात तर अजबच सरकार आहे. येथे बाळाला ठेवल्या जाणाऱ्या नावांची तर चक्क लिस्टच सरकारने बनवली आहे. त्यानुसारच येथे  बाळाचं नाव ठेवलं जात. ही नावाची लिस्ट तब्बल  7 हजार नावांची असून येथील जनतेला यानुसारच बाळाचे नाव ठेवावे लागते.

फ्रान्स- फ्रान्स एक असा देश आहे ज्या देशात थट्टा केली जाऊ शकणारी नावे बाळाला ठेवण्यास मनाई आहे. यात न्यूटिला, स्ट्राबेरी, डेमन, प्रिंस विल्यिम आणि मिनी कपूर या नावांचा समावेश आहे. विश्वास होत नसले तरी हे खरे आहे.

जपान- जपानमध्ये एक नाव असे आहे ज्याच्या अर्थामुळे ते बाळाला ठेवण्यास मनाई आहे.  ‘अकुमा’ असे हे नाव आहे ज्यावर जपान सरकारने बंदी घातली आहे. अकुमा या शब्दाचा अर्थ राक्षस असा होतो.

सौदी अरेबिया- सौदी अरेबियात तब्बल 50 नावांना बंदी घातली आहे. धर्माविरोधी तसेच देशाविरोधी नावांना तिथे बॅन करण्यात आले आहे. यात बिंयामीन, मल्लिका, मलक, लिंडा आणि माया या व अशा धर्मविरोधी, देशविरोधी नावांचा समावेश होतो.

नाॅर्वे- या देशात काही आडनावांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय आडनाव हे तुमचे पहिलं नाव ठेवण्यावरही नाॅर्वेमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मुख्य म्हणजे  हैन्सन किंवा हगेन यांसारखी आडनावे तेथे बॅन करण्यात आली आहे.