प्रशासनाचा अजब फतवा, एकादशी ऐवजी आदल्या दिवशी पंढरपूरात मांस आणि दारू बंदी 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – अयोध्येत रामाचे धार्मिक पवित्र राखण्यासाठी मांस आणि दारू बंदी करण्यात आली आहे. त्याच धरतीवर पंढरपूरात हि दारू आणि मन विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. परंतु हि बंदी फक्त दशमीच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी घालण्यात आल्याने या बद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अर्धवट फतव्याची  पंढरपूर परिसरात चर्चा रंगली आहे. तर वारकरी सांप्रदायाकडून या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जातो आहे.

अशी असायची पूर्वी बंदी
परंपरे नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशी अधिसूचना काढली जात असे कि, कार्तिकी एकादशीच्या यात्रेनिमित्त दशमी एकादशी आणि बारशी दिवशी मांस आणि दारू विक्रीला बंदीघालण्यात येत असे परंतु या एकादशी यात्रे निमित्त फक्त दशमी दिवशीच बंदी घातल्याने जिल्हाधिकरी कार्यालय संशयाच्या बोहऱ्यात सापडले असून त्यांच्या या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळावर बोलायला कोणीच तयार नसून या संदर्भात जिल्हाधिकरी कार्यालयाने अद्याप दुरुस्ती केलीली नाही. जिल्हा प्रशासनाने अशी चूक का केली आहे हि तपासण्यासारखी बाब आहे.

या आहेत पंढपुरातील यात्रेच्या एकादशी
पंढरपुरात तशी दर एकादशीला यात्रा भरत असते परंतु वर्षातील चार एकादशीला पंढरपुरात विशेष महत्व असते त्या चार एकादशी पुढील आहेत.

आषाढी एकादशी पंढरपूरात सर्वात मोठी यात्रा भरणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. हिंदू परंपरे नुसार सुरु होणाऱ्या हिंदू चातुर्मासाच्या सुरुवातीला हि एकादशी येते. आषाढ शुद्ध एकादशीला हि एकादशी येत असून या एकादशीच्या आदल्या दिवशी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरात दाखल होत असतात.

कार्तिक एकादशी हि कार्तिक महिन्यातील कार्तिक शुद्ध एकादशीला येत असते. या दिवशीही पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते तसेच यात्रेसाठी या दिवशी वारकरी राज्यातून पंढरीत दाखल होत असतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी गुरांच्या बाजाराचे आयोजन करण्याची परंपरा खूप वर्षांपासून आहे. अन्य दोन एकादशी म्हणजे माघ महिन्यात येणारी एकादशी आणि चैत्र महिन्यात येणारी एकादशी अशा चार एकादशी निमित्त पंढरपूरात यात्रा भरते.