GSAT-31 या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

नवी दिली : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ४०व्या GSAT-31 या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण झाले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री २ वाजून ३१ मिनिटांनी हा उपग्रह फ्रेंच गुएना येथील युरोपीय अवकाश केंद्रातून आकाशात झेपावला. उड्डाणानंतर ४२ मिनिटांनी ०३:१४ वाजता हा उपग्रह जिओ-ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थिरावला. हे प्रक्षेपण एरियनस्पेसच्या एरियन-५ रॉकेटद्वारे करण्यात आले.

हा उपग्रह भारताच्या जुन्या इनसॅट-४सीआर या उपग्रहाची जागा घेईल. जीसॅट-३१ हा अद्वितीय असा उपग्रह असून यामुळे भारतीय भूप्रदेश आणि बेटांवरील भागात दूरसंचार सेवा पुरविण्यास मदत होणार आहे, असे इस्रोचे चेअरमन डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे.

GSAT-31 या उपग्रहाचे वजन तुलनेने कमीच आहे. तरी देखील त्याच्या प्रक्षेपणासाठी एरियनस्पेसची मदत घेण्यात आली. कारण हे प्रक्षेपण घाईत करण्यात आले. GSAT-31 केवळ GSLB माक-३द्वारे रॉकेटचा वापर करत प्रक्षेपित केले जाऊ शकत होते, मात्र ही यंत्रणा आधीच चंद्रयान-२ साठी आरक्षित ठेवण्यात आली आहे, अशी माहिती इस्रायल यांनी दिली. आमच्याकडे GSAT-31साठी कोणतेही अतिरिक्त रॉकेट नव्हते असेही इस्रायल म्हणाले.

GSAT-31चा वापर कशासाठी
GSAT-31 उपग्रहाचा वापर व्हिसॅट नेटवर्क, टिव्ही अपलिंक, डिजिटल सॅटेलाइट न्यूज गॅदरिंग, डीटीएच टेलिव्हिजन सेवा आणि इतर अनेक सेवांसाठी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, हा उपग्रह आपल्या व्यापक बँड ट्रान्सपोंडरच्या मदतीने अरबी समुद्र, बंगालची खाडी आणि हिंदी महासागरासारख्या विशाल समुद्री क्षेत्रावर संचार सुविधेसाठी विस्तृत असे बीम कव्हरेज प्रदान करणार आहे.

काय आहेत जीसॅट- ३१ ची वैशिष्ट्ये
–या उपग्रहाचे वजन २ हजार ५३५ किलो आहे.
–या उपग्रहाचे आर्युमान १५ वर्षे आहे.

https://twitter.com/isro/status/1092947417551392769