विवाहबाह्य संबंधाच्या कारणावरुन विवाहितेचा ८ व्या मजल्यावरून ढकलून खून

गुरुग्राम : वृत्तसंस्था – पतीचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याने पतीने पत्नीचा खून केल्याची घटना गुरुग्राम येथे घडली आहे. ३२ वर्षीय पत्नीला ठार मारून तिने आत्महत्या केल्याचा बनाव पतीने बनवला होता. त्याचा हा कट पोलीसांनी शेजाऱ्याने दिलेल्या साक्षीने उधळून लावला आहे. पोलीसांनी मृत महिलेचा पती विक्रम चौहान याला बेड्या ठोकल्या आहेत.

२७ ऑक्टोबर २०१८ रोजी करवा चौथ चा उपवास होता. हिंदू संस्कृतीनुसार नवऱ्याचा चेहरा बघून करवा चौथचा उपवास सोडण्याची परंपरा आहे. म्हणून विक्रमाची पत्नी दीपिका चौहान विक्रमला सतत फोन करत होती, परंतु विक्रम हा त्याच्या प्रेयसी सोबत बाहेर  फिरायला गेला होता. दीपिकाने सतत फोन केल्याने विक्रमच्या रागाचा पारा वाढला. त्याने घरी आल्याबरोबर दीपिकाशी भांडण्यास सुरुवात केली. त्यांच्या भांडणाने शेजारी जागे झाले, परंतु त्यांच्या भांडणामध्ये कुणीही आले नाही. दीपिका भांडत असताना तिने विक्रमला त्याच्या प्रेयसीच्या घरी जाऊन आजच्या प्रकारचा जाब विचारणार आहे असे म्हटले. त्यानंतर विक्रम सैर भैर झाला आणि त्याने त्या अवस्थेत तिला राहत्या घराच्या इमारतीवरून खाली ढकलून दिले. इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून ढकलून दिल्यामुळे दीपिकाचा जागीच मृत्यू झाला.

अवनीचे बछडे सापडले… पण त्यांचा झाला संशयास्पद मृत्यू  

पोलीसांना मृत्यू संशयास्पद असल्याचे घटनास्थळी पोहचल्या बरोबर समजले. त्यानंतर त्यांनी त्या संशयाच्या अंगाने तपासाला सुरुवात केली. सर्व प्रथम दीपिकाच्या आत्महेत्येची करणे शोधण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला परंतु त्यांना आत्महत्येच्या अंगाने कोणतेही लीड मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी हत्येच्या अंगाने तपासाला सुरुवात केली. त्यात दीपिकाच्या पतीच्या फोनचे रेकॉर्ड तपासले गेले तेव्हा पोलीसांना दीपिकाचा पती शेफाली भनसी या ब्लॉग लेखिकेच्या प्रेमात असल्याचे समजले. पोलीसांनी या दोघा प्रेमी युगुलाला चौकशीसाठी बोलावले तेव्हा त्यांच्या हालचाली पोलीसांना संशयी वाटल्या. अशातच विक्रमच्या शेजाऱ्याने महत्वपूर्ण साक्ष पोलिसांना दिली. माझ्या मुलांवर माझे खूप प्रेम आहे, प्लिज मला मारू नका. अशा किंचाळ्या शेजाऱ्याने ऐकल्याचा दावा केला. पोलीसांनी या साक्षी नंतर विक्रम चौहान याला बेड्या ठोकल्या. विक्रम चौहान याने अटक झाल्यावर केलेल्या कृत्यांची कबुली दिली आहे.