गुगल भाऊ … हॅपी  बर्थडे… ! 

वृत्तसंस्था

सर्व काही माहिती असलेल्या गुगलचा आज वाढदिवस आहे .सर्व प्रश्नांची उत्तरे असणारे गुगल आज वीस वर्षाचे झाले आहे. म्हणूनच आज गूगलने एक खास डूडल तयार केलं आहे. कोणतीही माहिती हवी असले तर आपण लगेच ‘ गुगल’ करतो कोणत्याही विषयाची माहिती, फोटो , व्हिडीओ, बातम्या सर्व काही आपल्याला एका क्लिक वर मिळते . म्हणूनच कोणत्याही सर्च इंजिन पेक्षा गूगल ला विशेष स्थान आहे.

१९९८ साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. पण तरीही तारखेवरुन वाद कायम होता. त्यानंतर १७व्या वाढदिवसापासून २७ सप्टेंबरलाच गूगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. त्या नुसार हिशोबाने आज गूगलचा २०वा वाढदिवस आहे. ४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली आणि आज तर इंटरनेट सर्च इंजिनचं जायंट म्हणून गूगलकडे पाहिले जाते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20f463aa-c21c-11e8-a194-ed26bf470822′]

१९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर केले आणि अधिकृतपणे ‘गूगल’ असे नाव ठेवण्यात आले. २००२ साली गूगलने पहिल्यांदा डूडल तयार केले. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गूगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करते. गूगल जगभरात प्रसिद्ध असलेलं सर्च इंजिन आहे. प्रत्येक विषयांवरील माहिती, संदर्भ इथे अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. सुरुवातीला फक्त दुसऱ्या वेबसाईट्सचे डिटेल्स पुरवल्या जातील, अशी गुगलची कार्यप्रणाली होती. मात्र, या कंपनीने या विचारात बदल करुन असा प्लॅटफॉर्म बनवला जिथे जगभरातील माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आणि त्यावरूनच सुरूवात झाली ‘एका क्लिकवर सर्व काही’ या संकल्पनेची.

भारतात Google.co.in ही सेवा मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे. गुगलने मागील २० वर्षांत यशाची उत्तुंग झेप घेतली आहे. माहितीचे सारे युग गुगलने आपल्यात सामावून घेतला असून जगापुढे माहितीचे भांडार खुले करून दिले आहे.

पंतप्रधान मोदीही या समस्येने आहेत त्रस्त