अन … ‘खाकीतील बजरंगी भाईजान ‘ धावले तिच्या मदतीला , भेटवले आई वडिलांना 

फरीदाबाद (उत्तर प्रदेश)  : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट आला होता. अगदी याच चित्रपटाच्या कथेप्रमाणेच एका घटनेत एका चिमुकलीला  फरीदाबादच्‍या मानवी तस्‍करी विरोधी टीमने एका संकेताच्‍या अधारे तिच्‍या आई वडिलांपर्यंत पोहचविण्‍याचे कार्य केले आहे. खाकीतील या बाजरंगी भाईजान ची काहीशी मिळतीजुळती घटना सत्यात उतरली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , मागील पाच महिन्यांपासून घर चुकलेली एक १० वर्षीय मुलगी बालिका गृहात राहत होती. ही मुलगी फरीदाबाद येथील मानवी तस्‍करी विरोधात काम करणार्‍या टीमला सापडली होती. या मुलीला तिच्‍या आई वडिलांपर्यंत पोहचवण्‍याची शोध मोहीम सुरु होती. या मुलीकडून एक संकेत मिळाला होता. मुलीला घरापर्यंत पोहचविण्‍यासाठी हरियाणामधील गुडगावसह १२ शहरात शोध मोहीम राबविण्‍यात आली होती.
पोलिसांनी केले जी-तोड प्रयत्न 
फरीदाबाद येथील मानवी तस्‍करी विरोधात काम करणार्‍या  (ॲन्‍टी ह्यूमन ट्रॅफिकिंग) टीमचे प्रमुख साहय्‍यक पोलिस निरिक्षक अमर सिंह यांनी दिलेल्या माहिती नुसार , ही लहान मुलगी १३ जूनला सेक्‍टर ११ च्‍या जवळपास फिरताना दिसली. यावरुन लक्षात आले की, ही मुलगी  हरवली आहे. यानंतर लगेच पोलिस दर्शन यांनी या चिमुकलीस सेक्‍टर ८ येथील बालिका आश्रम गृहात पाठविले. त्‍यानंतर या लहान मुलीची विचारपूस करण्‍यात आली. या मुलीला घरच्‍यांविषयी काय सांगाता येत नव्‍हते. पण तिच्‍या लक्षात होती की तिच्‍या घराशेजारी मंदिर आणि मस्‍जिद आहे. या एका संकेतावर टीमने काम करण्‍यास सुरुवात केली. मुलीच्‍या बोली भाषेवरुन ती हरियाणा येथील असल्‍याची वाटत होती. यावरुन शोध मोहीम सुरु झाली.
‘मंदिर मस्जित जवळजवळ’ ही खून ठरली महत्वाची 
पाच महिन्‍यांचा कालावधी गेला तरीही शोध मोहीम सुरुच होती. पाच माहिन्‍यानंतर टीमला माहिती मिळाली की, भिवानी येथे मंदिर आणि मस्‍जिद जवळजवळ आहे. या एका संकेतावरुन दोन पोलिस १५ दिवस आधी लहान मुलीचा फोटो घेवून भिवानी येथील इकबाल नगर या  ठिकाणी पोहचले. मुलीचा फोटो पाहताच वडिलांनी ओळखले. ओळख पटताच पोलिसांनी या मुलीला आई वडिलांच्‍या ताब्‍यात दिले.