अण्णांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी अण्णा नगरमध्ये

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – उपोषणामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे अण्णांच्या तपासणीसाठी नगरमधील नोबेल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उपोषणानंतर काही दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांना आज दुपारी उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात आणण्यात आले आहे. नोबेल हॉस्पिटल येथे त्यांची तपासणी सुरू आहे. उपोषणामुळे थकवा येऊन त्यांच्या प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या रक्तप्रवाहावर परिणाम झाला आहे, असे सांगितले जात आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच अण्णा हजारे यांना नेमका कोणता त्रास होतो, याचा उलगडा होणार आहे.