क्राईम स्टोरी

ले व्हिक्टोरिया स्पामध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील विमानतळ परिसरात ले व्हिकोरिया स्पा अ‍ॅड सलून सेंटरमध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.१०) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून थायलंड येथील चार मुलींची सुटका केली आहे.

बंटीकुमार कांतीभाई पटेल (वय-२७ रा. कोरेगाव पार्क, मिरानगर सोसायटी, पुणे), विसेदे सोगोतसु (वय-२४ रा. कोंढवा मुळ रा. नागलँड) ही अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उप निरीक्षक चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.

विमातळ येथील गुलमोहर सोसायटीमध्ये ले व्हिकोरिया स्पा अ‍ॅड सलुन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरुक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. पथकाने या ठिकाणी ग्राहक पाठवून याची खातरजमा करुन घेतील. पथकाने या ठिकाणी छापा टाकून दोन दलालांना अटक केली. तर चार थायलंड येथील महिलांची सुटका केली. आरोपी यांनी पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होते. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून त्यांची सुटका केली असून त्यांना महमंदवाडी येथील रेस्क्यु होममध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या