विमाननगरमधील ‘लि-व्हिक्टोरिया स्पा’ मध्ये हायप्रोफाईल रेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विमाननगर येथील लि व्हिक्टोरिया स्पा अँड सलून मध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल रेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री विमानतळ पोलिसांनी लि व्हिक्टोरिया स्पावर छापा टाकून तेथील ५ थाईलंडहून आलेल्या युवतींची सुटका केली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
बंटीकुमार कांतिभाई पटेल (वय २७) आणि महिला एजेंट यांना अटक केली गेली आहे.
याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिक्टोरिया स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या थाई स्पा सेंटरवर छापा टाकला.त्यात पाच थाई युवतीकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले. या पाच ही थाई युवती टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्या होत्या. त्यांना जादा पैशांची लालुच दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. या पाचही युवतींना रेस्क्यु होम येथे ठेवण्यात आले असून विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहे.