‘त्या’ घुसखोरी करणाऱ्या महिलेला घातले कंठस्नान

अमृतसर : वृत्तसंस्था – भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका २५ ते ३० वयाच्या पाकिस्तानी महिलेला कंठस्नान घताले आहे. ही महिला पंजाब व पाकच्या सिमेतून भारतात घुसखोरी करताना आढळून आली त्यावेळेस भारताच्या जवानांनी तिला कंठस्नान घातले. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

ही महिला पंजबा मधील बांगर पोस्ट जवळ BSF च्या जवानांन काही तरी हालचाल करताना दिसली. त्या कारणांने त्या व्यक्तील तिथेच थांबण्याचा इशारा दिला. त्या व्यक्तीने हालचाल  मात्र थांबवली नाही. त्यामुळे त्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला, त्यानंतर ती महिला आहे सजमले, त्यात ती गंभीर जखमी झालेली  होती. काही वेळेनंतर त्या महिलेला जवानांनी डेरा बाबा नानाक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्या ठिकाणाहून त्या महिलेला अमृतसर येथे हलविण्यात आले. तिथेच त्या महिलेचा उपचारादरम्यान तिचं निधन झालं. ही महिला कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे, अद्याप केले नाही व याचा तपास सुरू आहे.