आधार कार्ड हरवलंय ? NO TENSION करू शकाल रिप्रिन्ट, या आहेत सोप्या स्टेप्स 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाळा, कॉलेज, बँक खाते आणि सिमकार्ड खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य नसले तरी एका महत्वपूर्ण ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्वाचे आहे. पण काही कारणास्तव तुमचे आधार कार्ड हरवले असल्यास आता त्याची रिप्रिन्ट काढता येणार आहे. आधार कार्डची आवश्यकता लक्षात घेता UIDAI ने रिप्रिन्टची सुविधा सुरू केली आहे.

UIDAI च्या वेबसाईटवर ऑर्डर आधार रिप्रिन्ट असा पर्याय देण्यात आला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करूनदेखील रिप्रिन्ट काढू शकता. हो, आता त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. UIDAI नुसार, आधार रिप्रिन्ट ही सुविधा चार्जेबल आहे. याचा फायदा घेण्यासाठी कार्डधारकाला ५० रुपये द्यावे लागणार आहेत. यात GST आणि स्पीट पोस्ट चार्जचादेखील समावेश आहे. पण मंडळी, या सगळ्यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. रिप्रिन्ट काढण्यासाठी तुमचा आधार नंबर किंवा व्हर्चुअल आयडेंटिफिकेशन नंबर असणं महत्त्वाचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तरीदेखील तुम्ही रिप्रिन्ट काढू शकता. यामध्ये रजिस्टर नसलेल्या मोबाईलवर नंबर ओटीपी मिळतो.

कशी काढाल रिप्रिन्ट ? या आहेत स्टेप्स

— सगळ्यात आधी UIDAI च्या वेबसाईटवर जा. त्यात ‘माय आधार सेक्शन’ च्या ‘ऑर्डर आधार रिप्रिन्ट’ पर्यायाला क्लिक करा.

— त्यानंतर एक पेज ओपन होईल, ज्यात तुम्हाला आधार नंबर किंवा सिक्योरिटी कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल तर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
— मोबाईल नंबर जर रजिस्टर्ड नसेल तर नॉन-रजिस्टर्ड मोबाईल नंबरच्या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला ओटीपी मिळाल्यानंतर रिप्रिन्ट आधार करा.
— यात जर तुमचा मोबाईल रजिस्टर नसेल तर तुम्हाला आधारची प्रिन्ट तर मिळेल पण त्याचा प्रिव्हू तुम्ही पाहू शकत नाही.
— रिप्रिन्टड आधार लेटर ५ दिवसात पोस्ट ऑफिसमध्ये येईल. आणि त्यानंतर ते तुम्हाला मिळेल.