हृतिकला अशा खास अंदाजात दिल्या टायगर श्रॉफ ने शुभेच्छा 

मुंबई : वृत्तसंस्था – आज हृतिक रोशनचा बर्थ डे या दिवसाचे औचित्य साधून त्याच्या लाखो -करोडो चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून तर शुभेच्छा दिल्याच पण बॉलिवूड मधल्या अनेक कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलिवूड मधला टायगर श्रॉफ हा सुद्धा हृतिकचा मोठा चाहता असून टायगरने त्याला एक खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहे.
टायगरने आपल्या इंस्टाग्राम वर एक व्हिडियो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हृतिक प्रमाणे डान्स करत आहे. टायगरने  त्या व्हिडियोला कॅप्शन  लिहिले आहे माझ्यासाठी  प्रेरणा असलेल्या व्यक्ती सोबत काम  करताना मी स्वतः ला खूप सौभाग्यशाली समजत आहे . धन्यवाद या पृथ्वीवर आल्याबद्दल आणि माझ्या प्रमाणे इतर लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी. हॅपी बर्थ डे हृतिक रोशन
 हृतिक प्रमाणे टायगर सुद्धा एक उत्तम डान्सर आहे. हृतिक आणि टायगर हे दोघे एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट एक्शन थ्रिलर चित्रपट असून यशराज बॅनर अंतर्गत हा चित्रपट बनणार आहे. १२ वर्षानंतर हृतिक या चित्रपटातून  यशराज बॅनर बरोबर काम करणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव फायनल झाले नाही.