थर्ड आय

ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला Huawei चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवसेंदिवस अनेक स्मार्टफोन बाजारात लाँच होताना आपण रोजच पाहतो. अशातच आता चीनची स्मार्टफोन कंपनी Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणल्याचे दिसत आहे. सदर स्मार्टफोनचे नाव Huawei Mate 20 Pro असे आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 69,990 रुपये इतकी आहे. मुख्य म्हणजे हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू, ब्लॅक आणि ट्वाइलाइट या तीन कलरमध्ये ग्राहकांना मिळणार असल्याचंही समोर आलं आहे.

सदर स्मार्टफोनच्या सेलची सुरूवात  प्राइम मेंबर्ससाठी 3 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.  सध्या हा स्मार्टफोन अॅमेझॉनच्या वेबसाइटवर ग्राहक खरेदी करु शकणार आहेत. इतकेच नाही तर अॅमेझॉनवर 71,990 रुपयांना हा स्मार्टफोन मिळणार असल्याचं समजत आहे. आनंदाची बाब अशी की,  लाँचिंगच्या ऑफरनुसार कंपनी सनहायजर कंपनीचा हेडफोन 2000 रुपयांना देत आहे. महत्त्वाचे म्हणजे  याची मूळ किंमत 29,000 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Huawei Mate 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स
  • – ड्युअल सिम
  • – अॅन्ड्राईड 9.0 पाय बेस्ड EMUI 9.0
  • – 6.39 इंचाचा क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले
  • –  OLED डिस्प्ले पॅनल यूज
  • –  6GB/ 8GB रॅमसोबत फ्लॅगशिप HiSilicon Kirin 980 प्रोसेसर
  • – इंटरनल मेमरी 128/ 256GB
  • –  ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • – 4,200mAh क्षमतेची बॅटरी
  • – 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ड्युअल बँड ब्लूट्यूथ  v5.0,  aptX सोबत ब्लूट्यूथ v5.0 LE, GPS/ A-GPS, ग्लोनास आणि एक USB टाइप-C पोर्टचा सपोर्ट.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − 3 =