‘या’ शहराचा थाटचं न्यारा… ! इथे सगळेच कोट्याधीश

बीजिंग : वृत्तसंस्था – जगाच्या पाठीवर कोणात्याही शहरात गेला तर तिथे तुम्हाला श्रीमंत-गरीब ही दरी पाहायला मिळते पण चिन्यांच्या अजब देशात एक असे शहर आहे जिथे सर्वच लोक कोट्याधीश आहेत. या गावाचा अतिश्रीमंतपणा पाहण्यासाठी बाहेरून पर्यटक येतात. एवढेच नाही तर या शहरातील प्रत्येक घरात स्वात:चे असे हेलिकॉप्टर आहे. या शहरातील लोक येण्या – जाण्याकरिता हेलिकॉप्टरचाच वापर करतात. हू असी (Huaxi) असे या शहराचे नाव आहे. अशाप्रकारचे जगातील हे एकमेव शहर आहे.

असा झाला या शहराचा उदय

हे शहर जगभरात आपल्या श्रीमंतीसाठी ओळखलं जातं. या शहरातील प्रत्येक व्यक्तीसोबत एकसमान व्यवहार केला जातो. जगातलं हे असं पहिलं शहर आहे जे पूर्णपणे मॉडल आणि सोशलिस्ट आहे. हे शहर १९६१ मध्ये वू रेनबाओ नावाच्या एका नेत्याने वसवलं होतं. वू रेनबाओ येथील लोकांना चांगला रोजगार देण्यासाठी फर्टिलायजर स्प्रे कॅनची फॅक्टरी सुरु केली होती. ही फॅक्टरी सुरु झाल्यावर अनेक बेरोजगारांना काम मिळालं. या कंपनीला पुढे चालून फार फायदा झाला. यातून मिळालेल्या पैशांचा वापर वू रेनबाओ यांनी शहराच्या विकासासाठी केला. आता या शहरात अनेक कंपन्या आहेत. आणि शहरातील लोक या कंपन्यांमध्ये भागधारक आहेत.

या शहराला स्वतःचे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी,ऑपरा हाऊस आहे

असे सांगतिले जाते की, आता या शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १.५ कोटी रुपये आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी हे लोक हेलिकॉप्टर आणि टॅक्सीचा वापर करतात. आता येथील लक्झरी लाइफस्टाइल बघण्यासाठी दुसऱ्या देशातील लोकही येतात. या शहरात अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध ऑपरा हाऊसही तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे हे शहर आणखी आकर्षक आणि सुंदर दिसतं. इथे राहणाऱ्या लोकांना जोपर्यंत ते इथे आहेत तोपर्यंत कंपनीकडून सर्वच सुविधा दिल्या जातात. जेव्हा त्यांना दुसरीकडे जायचं असतं तेव्हा सगळी संपत्ती इथेच सोडून जावं लागतं.