संतापजनक ! शस्त्रक्रियेनंतर डाॅक्टर महिलेच्या पोटातच विसरले कात्री 

हैदराबाद : वृत्तसंस्था – एका महिलेच्या शस्त्रक्रियेनंतर डाॅक्टर चक्क तिच्या पोटातच कात्री विसरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील हा धक्कादायक प्रकार आहे. या घटनेनंतर डाॅक्टरांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सदर 33 वर्षीय महिलेची हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर 12 नोव्हेंबर 2018 ला महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु यानंतर तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यानंतर त्या महिलेला उपचारासाठी तिच्या कुटुंबीयांनी पुन्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर उपाचारावेळी तिच्या पोटाचा एक्स-रे काढण्यात आला. यानंतर आलेला रिपोर्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला. महिलेच्या पोटात  शस्त्रक्रियेची कात्री तशीच राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला असह्य वेदना होत होत्या. हर्नियाच्या शस्त्रक्रियेदरम्यान या महिलेच्या पोटातच डॉक्टर शस्त्रक्रियेची कात्री विसरल्याची बाब तब्बल तीन महिन्यांनंतर समोर आली. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.

या घटनेनंतर सदर महिलेच्या पतीने डाॅक्टर आणि त्यांच्या टीमविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्कळ चौकशीला सुरुवात केली. दरम्यान या घटनेची दखल घेत रुग्णालयातील प्रशासनानंही या प्रकरणी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2017 मध्ये निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे महिलेचे हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर काही दिवसांतच तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तिला असह्य वेदना होऊ लागल्या. एक्स-रे काढल्यानंतर तिच्या पोटात कात्री आढळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर निदर्शनं काढली. तिला आता आणखी एका शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा प्रकार दुर्दैवी – रुग्णालय प्रशासन
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. रुग्णालयाचे संचालक के. मनोहर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, पोटात कात्री राहिल्यानं महिलेच्या आतील अवयवांना संसर्ग झालाय का ? याबाबत तपासणीही डॉक्टरांचं एक पथक करत असल्याचं समजत आहे. सध्या रुग्णालयातील त्रिसदस्यीय समिती या घटनेची अधिक चौकशी करत आहे.