भारताला पुन्हा एकदा इंग्लडकडून झटका 

अँटिगा : वृत्तसंस्था – भारतीय महिला संघाचं टी-२०  विश्वचषकातलं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. इंग्लंडने २०१७ मध्ये झालेल्या विश्वचषकात स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा ९ धावांनी पराभव केला होता आणि आजही इंग्लंडने टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव केला.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेंडूला गती आणि वळण मिळणाऱ्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचा निर्णय काहीसा बुचकळ्यात टाकणारा होता. मात्र, स्मृती मानधना आणि तानिया भाटिया यांनी संघाला सकारात्मक सुरुवात करून दिली. भारतीय महिला संघाने विश्वचषक टी-२० स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीच्या प्रथम फलंदाजी करताना ११२ धावा केल्या. चांगल्या सुरुवातीनंतर भारताची मधळली फळी कोसळल्याने भारताच्या कमी धावा झाल्या. भारताकडून स्मृती मानधनाने २३ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ३४ धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्सने २६ आणि हरमनप्रीत कौरने १६ धावांची खेळी रचून भारतीय डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आता टी-२० विश्वचषकात आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांत अंतिम सामना पाहायला मिळेल.
इंग्लंडची सुरुवात फार चांगली झाली नाही. टॅमी बीमोंट फक्त एक धाव करून  बाद झाली. पण इंग्लडने सावध खेळ करताना दहा षटकांत ६० धावा केल्या. स्किव्हरचा झेल सोडणं भारताला महागात पडले. स्किव्हर आणि ए जोन्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांच्या संयमी खेळीने भारतीय खेळाडूंच्या विजयाच्या आशा संपवल्या. हरमनप्रीतसह सर्व खेळाडू हतबत दिसत होते. या दोघींनी अगदी सहजतेने इंग्लंडचा विजय पक्का केला.
ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत –
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ७१ धावांनी धुव्वा उडवून महिला ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाने या उपांत्य सामन्यात विंडीजसमोर विजयासाठी १४३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा डाव अवघ्या ७१ धावांत आटोपला.

आयोध्येत तणाव, स्थानिकांकडून शिवसेनेच्या कार्यक्रमाला विरोध