काश्मीर मध्ये पुन्हा एकदा आयईडीचा स्फोट ; एक लष्करी अधिकारी शहिद

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस (आयईडीचा ) स्फोट झाला. दरम्यान या स्फोटात एक लष्करी अधिकारी शहिद झाला आहे. एलओसीवर तपासणी दरम्यान हा स्फोट झाला आहे.

गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शहिद झाले आहेत. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दरम्यान काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टरमध्ये एलओसीवर तपासणी सुरु होती. तपासणीदरम्यान पुन्हा एकदा इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस (आयईडीचा ) स्फोट झाला. या स्फोटात एका लष्करी अधिकारी शहिद झाला आहे.

दहशतवाद्यांनी रोखलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस (आयईडी) ची फसवणूक करताना मेजर-रँक सैन्य अधिकारी मारले गेले. अधिकारी कॉर्प्स ऑफ इंजिनिअरचे सदस्य आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण कक्षाच्या आत १.५ किलोमीटर अंतरावरील आयईडीची लागवड करण्यात आली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.