रक्तासाठी रिप्लेसमेंट डोनर मागितल्यास ‘हाॅस्पिटल’वर होणार कारवाई

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – रक्ताचा तुटवडा भासू नये, असे सांगत अनेक रुग्णालयांत रुग्णाच्या नातेवाईकांना रक्ताच्या बदल्यात रिप्लेसमेंट म्हणून डोनर आणण्यास सांगितले जाते. मात्र असा प्रकार नॅशनल ब्लड पॉलिसीच्या विरोधात आहे. याबाबत तक्रारी आल्यास त्यानुसार संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाणार असल्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) रुग्णालयांना केल्या आहेत.

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता असेल, तर नातेवाईकांना रिप्लेसमेंट म्हणून रक्तदाते (डोनर) आणण्यास सांगितले जाते. रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, हा रुग्णालयाचा हेतू असतो, पण रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा साठा करून ठेवण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयांची असते. त्यासाठी रक्तदान शिबिरे भरवून रक्तसाठा उपलब्ध करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी रिप्लेसमेंट रक्तदाता मागू नये, असा प्रकार नॅशनल ब्लड पॉलिसीच्या विरोधात आहे. त्यामुळे असा प्रकार घडू नये यासाठी पॉलिसीबाबतच्या सूचना एसबीटीसीकडून रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

राज्य रक्त संक्रमण परिषदेने काही दिवसांपूर्वी राज्यभरातील रक्तपेढ्यांना, रक्तपेढीत किती रक्ताचा साठा उपलब्ध आहे. रक्ताची किंमत काय, याबाबत दर्शनी भागात माहिती देण्याचा आदेश दिला होता. पण काही रुग्णालयांनी या आदेशाचे पालन केलेले नाही. अशा तक्रारी आल्यास त्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल. याबाबत नॅशनल ब्लड पॉलिसी संदर्भातल्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने खासगी आणि सरकारी रुग्णालयांना दिल्या आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांकडून रक्ताची मागणी करू नये, अशी सूचनाही देण्यात आली आहे. रक्तसाठा उपलब्ध करण्याची त्या त्या रुग्णालयांची जबाबदारी आहे. त्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

१ हजाराची लाच घेणारा पोलीस काॅस्टेबल ‘एसीबी’च्या जाळ्यात