‘हिंमत असल्यास पाकिस्तानने युद्ध करावे’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – हिंमत असल्यास पाकिस्तानने युद्ध करावे असे वक्तव्य कर्नल हरजिंदरसिंग यांनी केले आहे. पाकिस्तानमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भारतीय सैन्याविरोधात युद्धात ताकद दाखवावी. छुपे आत्मघाती हल्ले करू नये, असे आवाहन त्यांनी दिले आहे. जळगावात ते बोलत होते यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

जळगाव शहरातील मायादेवी नगरात रोटरी भवनात रोटरी जळगाव परिवारातर्फे जवाानांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरजिंदरसिंग यांनी पुलवामा हल्ल्याला घेऊन भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “जेवढे जवान शहीद होतात त्यांच्या दुप्पट संख्येने देशात जवान तयार होत असतात. याबद्दल त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील उदाहरण सांगितले. सुभेदार अनिलकुमार यांनी १९६५, १९७१ व कारगील युद्धात प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानवर मात केल्याचे सांगून या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी रोटरी वेस्ट अध्यक्ष संगीता पाटील, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, डॉ. जयंत जहागिरदार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी शहीद जवानांची नावे वाचून दाखविली. सूत्रसंचालन गनी मेमन यांनी केले. कार्यक्रमास लक्ष्मीकांत मणियार, विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

शहीद जवानांसाठी निधी

रोटरी परिवारातर्फे रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यापासून पुलवामा आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून पूर्ण दिवसाचा खेळ स्थगित ठेवण्यात आला. विशेष म्हणजे या आयोजनातून उभी करण्यात येणारी रक्कमदेखील भारतीय सेनेसाठी देण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष प्रखर मेहता यांनी आयोजकांतर्फे दिली आहे.