गावठी हातभट्टी गाळप ठिकाणावर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी, भाटनगर मधील बेकायदेशिररित्या सुरु असलेल्या गावठी गाळप हातभट्टी अड्यावर पिंपरी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापे टाकले. यावेळी मोठ्या प्रमाणावर दारु साठा जप्त करुन दहाजणांवर कारवाई करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c432a7b-aad9-11e8-990a-21ae30a383ad’]

पिंपरी-चिंचवड शहरातील गावठी हातभट्टी गाळप हे भाटनगर परिसरात केले जाते. अनकेदा या हातभट्टी अड्ड्यावर कारवाई केली जाते. दारु साठा आणि गाळपासाठी लागणारे साहित्य पोलीस जप्त करतात. मात्र काही दिवसांनी त्या हातभट्या पुन्हा सुरू होतात. त्यानंतर अधून मधून पुन्हा कारवाई केली जाते. विशेष म्हणजे याच परिसरात काही अंतरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. दारु आणि दारू गाळप करणाऱ्यावर कारवाई करण्याची पहिली जबाबदारी या विभागाची आहे. मात्र ती होताना दिसत नाही. कागदोपत्री कारवाई केल्याची भली मोठी यादी मात्र त्यांच्याकडे मिळते.

पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी दिपक साकोरे 

पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, रंगनाथ उंडे, सहायक निरीक्षक अन्सार शेख, रामदास मुंढे, उपनिरीक्षक सागर पाटील, उत्कर्षा देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी ४७ लिटर हातभट्टी दारु, १५०० लिटर रसायन असा २३९१० रुपयांचा ऐवज जप्त करुन तो जागीच नष्ट केला. तसेच दहा लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

वाचा आजच्या टॉप बातम्या