इम्रान खानच्या पत्नीने नोंदवले भारताच्या बाजूने मत 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल मंगळवारी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर आज त्यांच्या पूर्वीच्या पत्नीने मत नोंदवले आहे. इम्रान खान हा खोटारडा माणूस आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या परवानगीची तो वाट पहात होता असे मत इम्रान खान यांच्या पहिल्या पत्नी रेहम खान यांनी म्हणले आहे. आपल्या तत्वाला तिलांजली देत इम्रान खान पाकिस्तानचा पंतप्रधान झाला आहे असे त्यांच्या पत्नीने म्हणले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पुरावे मंगळवारी इम्रान खान यांनी भारताकडे मागितले आहे. आमचाच देश दहशतवादाने त्रस्त आहे, आमच्या देशातच दहशतवादाने ७० हजार बळी घेतले आहेत. आम्ही कशाला दशतवादी हल्ला करू. आमचा देश जुना राहिला नाही. आता हा नवा पाकिस्तान बनला आहे असे इम्रान खान यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हणले आहे. भारताच्या कार्यवाहीला घाबरलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी आम्ही कार्यवाहीला चोख उत्तर देऊ असे देखील म्हणले होते.

सत्ता हातात घेऊन सहा ते सात महिने झाली तरी इम्रान खानने पाकिस्तानच्या जनतेसाठी काहीच हिताचे काम केले नाही. इम्रान खान म्हणत आहे कि दहशतवादी संघटनांचा आणि पाकिस्तानचा काहीच संबंध नाही तर मग दहशतवादी संघटनांच्या विरोधात काहीच कार्यवाही का झाली नाही असा सवाल इम्रान खानची पहिली पत्नी रेहम खान हिने केला आहे.