त्याने झेल पकडला तरीही त्याचा झाला पोपट 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्या खेळाडूकडून अनेकदा चांगली कामगिरी केली जाते अशा वेळेस त्यांचे चाहते जल्लोष करताना दिसतात. अनेकदा खेळाडूने एखादी चांगली कामगिरी केली तर तो चाहत्यांना डिवचतो असेही आपण पाहिले आहे. परंतु एका खेळाडूने झेल टिपला, चाहत्यांना डिवचलं, पण त्यानंतर मात्र त्याचा पोपट झाल्याचेच पाहायला मिळाले. अनेकदा खेळांडूंना फजितीचा सामना करावा लागतो.

जाहिरात

ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियातली. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी एक सराव सामना सुरु असताना ही गोष्ट घडली. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी त्याला चाहत्यांनी काही टोमणे मारले. हे टोमणे त्याच्या क्षेत्ररक्षणाबद्दल होते. पण काही वेळातच ताहिरने एक झेल पकडला. हा झेल पकडल्यावर त्याने चेंडू हातात धरून आपल्या जर्सीचा क्रमांक चाहत्यांना दाखवून डिवचण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर हा नो बॉल असल्याचे त्याला समजले आणि त्याचा पोपट झाला. या प्रसंगाने चाहत्यांमध्ये एकच हशा पिकला.

जाहिरात