निगडीत पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे पकडले….

पिंपरी : पोलीसनामा  ऑनलाइन 

बेकायदेशीरित्या गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली . त्यांच्याकडून 51 हजार रूपये किमंतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. ही कारवाई निगडीतील अंकुश चौक येथे शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.

हातपाय बांधून विवाहितेला मारहाण

ऋतीक रतन रोकडे (वय 19) रा. बाबासाहेब आंबेडकर भवन शेजारी,चिखली.व सचिन दिपक लोखंडे, (वय 21) रा. रोकडेचाळ चिखली या दोघांना अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c7a07cd-bf21-11e8-a243-03438c28aee7′]

याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई स्वप्नील विश्वनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. अंकुश चौक निगडी येथे बेकायदेशीर रित्या हत्यारे घेऊन काही तरूण थांबले असल्याचे माहीती पोलिस सूत्रांना मिळाली होती. त्यानुसार गु्न्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने सापळा रचून दुचाकीवर असलेल्या रोकडे यांनी लोखंडे यांना ताब्यात घेतले. लोखंडे याची झाडाझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यामुळे दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडे आणखी काही पिस्तुले किंवा हत्यारे मिळतात का याचा तपास पोलिस करत आहेत.

[amazon_link asins=’B01FM7GGFI,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44a000c0-bf22-11e8-bc82-e91b872d01d6′]