पुण्यातील ‘तो’ बेपत्ता तरुण सापडला

पुणे पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील मतिमंद असणारा एक युवक दि. २१ मे रोजी त्याच्या राहत्या घराच्या ठिकाणावरुन बाहेर पडला होता. यानंतर तो घरी परतला नसल्याने त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. यानंतर कुटूंबियांनी कसबा पोलिस चौकीत तक्रार दाखल केली होती. अमरावतीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने युवक निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी कुटुंबियांशी संपर्क करून तरुणास घरच्यांकडे सुपूर्द केले.

स्वप्निल समेळ (वय ३५, रा. कसबा पेठ, पुणे) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनांक ३ जून रोजी अमरावती येथील धामणगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते लुकेश हटवार यांना सदर युवक निदर्शनास आल्याने त्यांनी अमरावती येथे पोलिसांशी संपर्क साधला. अमरावती पोलिसांनी स्वप्निलच्या घरी संपर्क करून त्याची माहिती दिली. कुटुंबीयांनी स्वप्नीलला अमरावतीमध्ये जाऊन ताब्यात घेतले.

हरवलेला युवक हा मतिमंद असल्याने तातडीने कसबा पोलिस चौकीचे पो.उ.नि. भोपळे यांनी अमरावतीमधे त्यांचे सहकारी मित्र पो.उ.नि.बोरकर यांच्याशी संपर्क साधून पुण्याहून हरवलेल्या युवकाच्या नातेवाईकांना रवाना केले. युवकाचे नातेवाईक अमरावती येथे पोहचले. त्यांनी स्वप्निलला पाहून तेथील पोलिस विभाग व सामाजिक कार्येकर्ते लुकेश हटवार व पो.उ.नि. राहूल बोरकर यांचे आभार मानले व स्वप्निलला घेऊन ते सुखरुप पुण्याकडे निघाले. वडिल सुरेश समेळ यांना आपला मुलगा परत सुखरुप मिळाल्याने त्यांना आनंदाश्रु आवरले नाहीत.

ही कामगिरीमधे फरासखाना पोलिस स्टेशनचे व.पो.नि. बाळकृष्ण अंबुरे, कसबा पोलिस चौकीचे पो.उ.नि. प्रविण भोपळे, गुरुदास नाईक तसेच पो.ह. संदेश कर्णे, किरण कदम, आकाश वाल्मिकी, कापरे तसेच पुणे शहरामधे समाज विधायक कार्य करणाऱ्या दिव्य फांऊडेशनच्या अध्यक्षा सारीका अगज्ञान, हिरालाल अगज्ञान, पुणे मनपाचे सभासद योगेश समेळ या सर्वांच्या सहकार्याचे वडिल सुरेश समेळ यांनी आभार पोलिसांचे आभार मानले.