क्राईम स्टोरी

प्रधानमंत्री योजनेतील पैशांसाठी लहान भावाने मोठ्या भावाचा केला खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सन्मान योजना लागू केली असून या योजनेतून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम जमा होणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन भावात भांडण झाले. यातूनच लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील टेलकामठी येथे घडली. याप्रकरणी लहान भावाला अटक केली असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा सर्व प्रकार समोर आला.

रमेश संतोष वाडीकर असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव असून याप्रकरणी गणेश संतोष वाडीकर याला पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजना लागू केली असून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी ग्रामपंचायतीमध्ये पाच एकराच्या आत असलेल्या शेतकऱ्यांची यादी लावून शेतकऱ्यांकडून सातबारा आणि इतर कागद पत्रे मागविले. या योजनेमध्ये रमेश वाडीकर आणि गणेश वाडीकर हे दोघे भाऊ पात्र ठरले. त्यांच्याकडे कौटुंबिक चार एकर शेती आहे. मात्र जमीनीचा सातबारा वेगळा नसल्याने ही रक्कम कोणी घ्यायची यावरुन त्यांच्यात वाद झाला.

वाद तिथेच न थांबता, सायंकाळी पुन्हा दोघा भावांचे शेतात भांडण झाले. राग अनावर झाल्यानं लहान भाऊ गणेश याने मोठा भाऊ रमेश याच्या डोक्यावर दगडानं वार केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने गावकऱ्यांनी बेशुद्ध झालेल्या गणेशला बेशुद्ध अवस्थेत सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी दरम्यान मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या