खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

पिंपरी चिंचवड : पोलिसनामा ऑनलाईन – दोन वर्षांपासून खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना खंडणी व दरोडा प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले अटक आहे.अक्षय चंद्रकांत भोरे (२३), कपिल संजय गायकवाड (वय २२, दोघे रा. आंबेडकर वसाहत, पिंपरी, पुणे) व सिद्धार्थ उर्फ मामू गणेश यादव (२३, रा. साई चौक, पिंपरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

चाकण पोलिसांकडून खूनासह 5 जबरी चोरीचे गुन्हे उघड 

अटक केलेल्या तिघांनी २०१६ मध्ये पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंगल घडवून मारामारी केली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये अक्षय भोरे हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. त्याची माहिती पोलीस नाईक शैलेश सुर्वे व आशिष बोटके यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत, फौजदार विलास बढे, कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, शरिफ मुलानी, आशिष बनकर, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, प्रविण माने, गणेश कोकणे या पथकाने सापळा रचला.

खंडणी व दरोडा विरोधी पथकाने पिंपरीतील तपोवन मंदिर येथून अक्षय भोरे याला अटक केली. त्याने कबुली देऊन त्याच्या इतर दोन साथीदारांची देखील माहिती दिली. पोलिसांनी कपिल गायकवाड व मामू यादव या दोघांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.