‘या’ शहरात लग्नासाठी भरतो मुलींचा बाजार : पैसे देऊन विकत घेतल्या जातात मुली  

बल्गेरिया  : वृत्तसंस्था – बल्गेरिया या ठिकाणी ३ वर्षातून एकदा  नवरींचा बाजार भरतो.  या बाजारात  मुली विकल्या जातात विकल्या जाणाऱ्या मुलींमध्ये सर्व वयोगटातील मुलींचा समावेश असतो. याठिकाणीही तरुण मुलगा येऊन चक्क  मुलगी खरेदी करतो. अनेक वर्षा पासून हा बाजार या ठिकाणी भरत आहे. लग्न लावून द्यायची घरच्यांची परिस्थिती नसल्यामुळेतेथे मुलींना विकण्यात येते.

या बाजारात तरुण मुले आपल्या आई- वडिलांसोबत येतात आणि मुलगी पसंत करतात. मुलगी पसंत केल्यानंतर घरचे बोलणी करतात. मुलींच्या घरचे रक्कम ठरवतात मुलगी खरेदीची ही परंपरा वर्षानुवर्षे बल्गेरियात चालू आहे. ही प्रथा गरीब लोकांची परिस्थिती ध्यानात ठेऊन  सुरु करण्यात आली होती. या बाजारात अशीच लोक येतात ज्यांची लग्न लावून द्यायची परिस्थिती नसते. आपल्याकडे मुलाला हुंडा देण्याची प्रथा आहे  परंतु तिथे मुलीच्या घरच्यांना हुंडा दिला जातो. यामुळे गरीब कुटुंबाला आर्थिक मदत ही होते. त्यामुळे या प्रथेला कोणताही कायदा रोखू शकत नाही.

या बाजारात नवरी मुलगी एकटी येत नाही तर  तिच्यासोबत घरच्यांनी येणे गरजेचं आहे. हा बाजार ‘कलाइदुसी’ या समुदायाकडून लावला जातो.  या समुदायाच्या मुलीशिवाय इतर कुठली बाहेरची मुलगी नवरी म्हणून स्वीकारली जात नाही.