पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पंधरा ऑगस्ट रोजी सुरु झालेले पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालय अनेक सुविधामुळे वंचित आहे. गेली चार महीने ऑटो क्लस्टर येथून चालणारे आयुक्तालयाचे कामकाज नवीन वर्षात प्रेमलोक पार्क येथून सुरु झाले आहे. या इमारतीचे उद्‌घाटन उद्या बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी प्रेमलोक पार्क मधील महनगरपालिकेच्या शाळेची इमारत देण्यात आली आहे. मात्र 15 ऑगस्ट रोजी इमारतीची डागडुजी न झाल्याने या ठिकाणाहून कामकाज होऊ शकले नाही. तत्पुरत्या स्वरुपात ऑटो क्लस्टर येथून कामकाज सुरु होते. या चार महिन्यात या इमारतीची डागडुजी करुण उत्कृष्ठ फर्नीचर करण्यात आले आहे. नवीन वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2019 पासून आयुक्तालयाचे कामकाज या इमारतीमधून सुरु करण्यात आले आहे.

आजही हे नवीन आयुक्तलाय अनेक सुविधामुळे वंचित आहे. यातील इमारतीची समस्या सुटलेली आहे. दोन मजली प्रशस्त असे कार्यालय आयुक्तलयासाठी झालेले आहे. याच इमारतीचे, कार्यलयाचे उदघाटन बुधवारी होणार आहे. आयुक्तालयत फित कापली जाणार असून त्यानंतर जाहीर सभा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. यावेळी सर्व राजकीय पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.