पोलिस क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सांगली पोलिस मुख्यालयातील मैदानावर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी काळम-पाटील यांच्याहस्ते क्रीडा ज्योतीचे पूजन करण्यात आले.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc4e41d9-abae-11e8-ba2b-5fdaa7c3af01′]
जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी क्रीडा ज्योतीचे पूजन झाल्यानंतर संचलन केले. त्यानंतर खेळाडूंना शपथ देण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले. या सोहळ्याला पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापौर संगीता खोत, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उल्हास चिप्रे, महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, मिरजेचे उपअधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पुण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मुलाचा प्रवासादरम्यान मृत्यू

यावेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, सांगली जिल्हा पोलिस दलाची क्रीडा स्पर्धेतील कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. खेळाडू वृत्तीने या स्पर्धा पार पडतील. कोल्हापूर परिक्षेत्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सांगलीचे खेळाडू नक्की उठावदार कामगिरी करतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी