कोंढव्याचा विकास हेच माझे ध्येय : हाजी फिरोज

पुणे :पोलिसनामा ऑनलाईन – कोंढवा येथील प्रभाग क्रमांक २७, मधील साईबाबानगर न्यू ग्रेस स्कूल समोरील जमजम मेमोरीज व इतर सोसायटी मधील रहिवासी यांना गेली अनेक वर्षा पासून ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणीची समस्या, रहदारीच्या रस्त्यावर वाहन चालविताना त्रास होत होता.

याची दखल घेऊन ऑल कोंढवा सोशल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हाजी फिरोज शेख यांनी नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांच्या विकास निधीतून साईबाबानगर मधील न्यू ग्रेस स्कूल समोरील रस्त्यावर ड्रेनेज लाईन ,पिण्याचे पाणीची लाईन टाकण्याचे आणि रास्ता काँक्रीटीकरण करण्याचे कामाचे उदघाटन स्थानिक नागरिकांचे शुभ हस्ते घेण्यात आले.

यावेळी हाजी फिरोज म्हणाले नागरिकांचे समस्या सोडविणे, स्मार्ट कोंढवा, भय मुक्त कोंढवा, नागरिकांचे मन जिंकणे खऱ्या अर्थाने हेच आमचे यश आहे हे माझे ध्येय आहे.या वेळी मा.नगरसेवक राईस सुंडके,अब्दुल बागवान (वरिष्ठ उपाध्यक्ष ओ.बी.सी. सेल, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस) जकी सर, फैयाज मोमीन, रफीउद्दिन चाचा, इरफान भाई, नदीम गोलंदाज, सरदार सज्जन, जावेद खान, इम्रान सय्यद, बशीर गोलंदाज, फर्मान खान, समीर मुलानी, इम्रान नदाफ, इस्माईल भाई, मोहसीन दिल्लीवाला, मन्सूर अत्तार, जावेद पठाण, अजहर पठाण, सलमान कार्यकर्ते अमजद पठाण, जबिर शेख, लियाकत शेख व शाहनवाज शेख उपस्थित होते।