धुळ्यातील ‘त्या’ नामांकित रुग्णालयांवर ‘इन्कम टॅक्स’ची धाड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील नामांकित डॉक्टरांच्या घरी व रुग्णालयात आज पहाटे गोपनीय पध्दतीने आयकर विभागाने धाडी टाकल्या. यामध्ये मालेगाव रोड येथील डाॅक्टर निखील शहा आणि साक्री रोड येथील कृष्ण मोहन सैंदाणे यांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहा आणि सैंदाणे यांनी शासकिय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर करुन स्वता:ची घरं भरल्याची चर्चा सुरु होती. यावरुन आयकर विभागाला मिळालेल्या माहिती नूसार त्यांनी आज पहाटे शहा आणि सैंदाणे यांच्या घरी आणि रुग्णालयावर धाडी टाकल्या. यामध्ये महत्वाची कागदपत्रे आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. या कागदपत्रांची तपासणी होत असून नेमकी काय कारवाई करण्यात येणार आहे याबबतची माहिती सायंकाळी उशीरा सांगण्यात येईल, अशी माहिती आयकर विभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – ‘त्या’ भाजप लोकप्रतिनिधीची ‘अश्लील क्लिप’ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ  

दरम्यान, वर्षभरापूर्वी अशीच कारवाई मंत्री, आमदार निवास स्थानी झाली होती.