सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने पोस्ट टाकणाऱ्या शिक्षिकेस अटक

बेळगाव : कर्नाटक वृत्तसंस्था – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियात पाकिस्तानच्या बाजूने पोस्ट टाकणाऱ्या उर्दू शिक्षिकेला बेळगाव येथील मुरगोड पोलीसांनी अटक केली आहे. जेलिका ममदापूर (रा. कडबी शिवापूर, ता. सौंदत्ती) असे त्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या शिक्षिकेच्या विरोधात पोलीसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

पाकिस्तानच्या बाजूने सोशल मीडियात पोस्ट टाकल्यामुळे पोलीसांनी शिक्षिकेला अटक करतातच संतप्त ग्रामस्थांनी त्या शिक्षिकेचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात पोलिसांनी सात जणांना ताब्यात केली आहे.

जिलेका हि एका खासगी उर्दू शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली ज्या पोस्ट मध्ये पाकिस्तान कि जय हो असे म्हणण्यात आले होते. तसेच तिने आपल्या व्हॉटस्अ‍ॅप खात्याचा डीपी देखील असाच देशविरोधी ठेवला आहे. त्या डीपीचा स्क्रिनशॉट आणि फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्या महिलेच्या विरोधात संतापाची लाट उसळली.सौंदती तालुक्यात या महिला शिक्षिकेचे हे दोन फोटो व्हायरल झाले.

परिस्थितीचे भान राखून पोलीसांनी त्या देशद्रोही शिक्षिकेला ताब्यात घेऊन तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच प्रमाणे संतप्त जमावाने तिचे घर पेटवून देण्याचा हि प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. त्यांनी या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे.