राजकीय

‘पंतप्रधान मोदी हेच लुटीला प्रोत्साहन देत आहेत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदी हेच लुटीला प्रोत्साहन देत आहेत असा गंभीर आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा निशाणा साधल्याचे दिसून आले. ‘प्रत्येक संरक्षण करारात भ्रष्टाचारविरोधी अटी-शर्ती असतात. पण पंतप्रधान मोदींनी राफेल करारातील अटी व शर्ती वगळल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय. पंतप्रधान मोदी हेच लुटीला प्रोत्साहन देत आहेत हे यावरून स्पष्ट होतंय,’ असं राहुल म्हणाले.

दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे दिल्लीतील आंध्र भवनात उपोषणाला बसले आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. तसेच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी नायडू यांची मागणी आहे. त्यांचे हे उपोषण एकदिवसीय असून विरोधी पक्षांनी त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर, ममता बॅनर्जी यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. शिवाय राहुल गांधी यांनीही आंध्र भवनमध्ये जाऊन नायडूंची भेट घेतली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली.

मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, “मी आंध्र प्रदेशातील नागरिकांच्या सोबत आहे. हे पंतप्रधान कसे आहेत? त्यांनी आंध्र प्रदेशच्या नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. मोदी जिथे जातात, तिथे खोटं बोलतात. आता त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.” असंही राहुल गांधी म्हणाले.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button