PCB अधिकाऱ्यांची BCCI शी मिटिंग

मुंबई : पोलीलनामा ऑनलाईन – आगामी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीसंघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी भारताच्या माजी क्रिकेट खेळांडूनी केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने  पाकिस्तान सोबतच सामना खेळू नये अशी मागणी अनेक माजी खेळाडूंनी केला आहे. त्यामुळे पाक क्रिकेट बोर्ड अडचणीत आले आहे. त्यामुळे दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीदरम्यान या मुद्यावर PCB आणि BCCI यांच्यात चर्चा होणार असल्याची चर्चा एका इंग्रजी माध्यमांनी दिली आहे.

खेळांमध्ये राजकारण आणू नये असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं स्पष्ट म्हणंण आहे. या आधी भारत आणि पाक यांच्यात २०१७ मधील आसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीत सामाने झालेले होते, तसेच २०१८ च्या आशिया चषकात ही भारत पाकिस्तान सामने खेळले होते. २००८ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका खेळली गेली नाही. जम्मू-काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी झालेल्या हल्ल्यामुळे भारतीय संघाने २०१९ च्या विश्वचषाकात पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामना खेळण्यास विरोध दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड यांच्यात दुबई मध्ये चर्चा रंगणार असल्याचे समजले जात आहे.

येत्या २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत भारत-पाक यांच्यातील विश्वचषाकांतील होणाऱ्या सामांन्याबद्दल ICC ची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी ICC चे प्रमुख डेव्हीड रिचर्डसन हे उपस्थित राहणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यांतील मतभेत दुर करण्यात येणार आहे का नाही हे पाहिला मिळणार आहे. या सामन्यांचे तिकिट विक्री आजून केलेली नाही. दोन्ही देशांचे वातावरण पाहून तिकीटांची विक्री केली जाईल. पण BCCI आणि PCB यांच्यात भारत-पाक यांच्यातील सामना होण्याबाबत दोन्ही देशात एकमत झाले, तर यां दोघांमधील सामना खेळण्यास काही हरकत नाही असे ICC प्रमुख डेव्हीड रिचर्डसन म्हणत होते.