सेल्फी लव्हर्स साठी शॉकिंग न्युज …!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक सोशल नेट्वर्किंग साईटस पैकी खूप कमी कालावधीत तरुणाईचे आवडते अ‍ॅप ठरलेल्या इन्स्टाग्रामला मोठ्या बगचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फेसबुकच्या मालकीचे असलेल्या इन्स्टाग्रामच्या अनेक युझर्सचे २४ तासात मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स कमी झाले आहेत. याचा फटका इन्स्टाग्राम आणि युजर्सला करावा लागत असून सोशल मीडियावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लवकरच तोडगा निघणार : इंस्टाग्राम

या बगसंबंधी माहिती मिळाल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. इन्स्टाग्रामने यावर बोलताना सांगितले की, लवकरच हा बग फिक्स करण्यात येणार आहे. इन्स्टाग्रामने सांगितले, की आम्ही या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्न करत आहोत. लवकरच हा बग फिक्स करण्यात येणार, अशी माहिती कंपनीने दिली आहे. अनेक युझर्सनी तक्रार केली आहे की, त्यांचे २४ तासात अनेक फॉलोअर्स घटले आहेत. तर काही सेलिब्रिटी युझर्सनी तक्रार दिली आहे. लाखोच्या संख्येत त्यांचे फॉलोअर्स कमी झाले आहेत. इन्स्टाग्राम सारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेळोवेळी फेक अकाउंटची माहिती घेण्यासाठी आणि त्यांना डिलीट करण्यासाठी क्लिनअप करत असतात. तेव्हा फॉलोअर्सच्या संख्येत घट झाल्याचे आढळते.

मात्र यावेळी हे एका बगमुळे झाले आहे आणि कंपनीने याला दुजोरा दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये इन्स्टाग्रामने म्हटले होते, की फेक लाईक, फेक कॉमेंट आणि फेक फॉलोअर्सला रिमूव्ह करण्यावर भर देत आहोत. यासाठी मशीन लर्निंग टूल्सचा वापर करण्यात येणार आहे.