आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; भारतात एकाच वेळी दोन महासोहळ्यांचा आनंद 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु असताना त्यात देशात सर्वाधिक प्रसिद्ध लीगही रंगणार आहे. त्यामुळे एकाचवेळी देशात दोन खेळ पाहायला मिळणार आहे. देशातील इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) ची सुरुवात लवकरच होणार आहे. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

४ फेब्रुवारीला आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु लोकसभा निडवणुकीच्या तारखा ठरल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. मात्र, आज अचानक आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली. आयपीएलने अधिकृत ट्वीटर वरून ट्वीट करत वेळापत्रक जाहीर केले आहे.

सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. ३० मे ते १४ जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, आयपीएलच्या १२ व्या हंगामाची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या सामन्याने होईल. देशात निवडणुका आणि आयपीएल हे दोन्ही महासोहळे एकाचवेळी जर भारतात झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येणार हे निश्चितच आहे.

https://twitter.com/IPL/status/1097788731652796417