‘या’ चित्रपटाच्या रीमेक मध्ये काम करतोय ‘हा’ बहुचर्चित अभिनेता 

केरळ : वृत्तसंस्था – बाहुबली सिरीजमध्ये भल्लाळदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबाती आता एका नव्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. भल्लाळदेव म्हणजेच राणा दग्गुबाती लवकरच राजेश खन्ना यांच्या ‘हाथी मेरे साथी’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.
राजेश खन्ना यांचा ‘हाथी मेरे साथी’ हा सिनेमा १९७१ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि तेलुगु या भाषांमध्ये बनवण्यात येणार आहे. ही माहिती खुद्द त्याने ट्विटरवर दिली आहे.
राणा दग्गुबतीने ट्विट केले की,’सकाळी.. हाथी मेरे साथी चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळच्या जंगलात रवाना. ‘हाथी मेरे साथी’ चित्रपट मानव व प्राण्यांवर आधारीत असून यात राणासोबत पुलकित सम्राट, विष्णु विशाल, जोया हुसैन व कल्कि कोचलिन यासारखे कलाकार यात पाहायला मिळणार आहेत.
इरॉस इंटरनॅशनलच्या ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाचे तमीळमध्ये कादन व तेलगूमध्ये अरान्या असे आहे. प्रभू सोलोमन दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तेलगू व तमीळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरीत असून राजेश खन्ना व तनुजा अभिनीत १९७१ साली प्रदर्शित झालेला हाथी मेरे साथीला श्रद्धांजली देणार आहे.
राणा दग्गुबातीचा चित्रपट ‘बाहुबली 2’ ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्ड आधीच तोडले आहेत. जवळपास 2000 कोटींची कमाई बाहुबली 2 ने केली होती. 2017 मधला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान ‘बाहुबली 2’ ला आधीच मिळाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. बाहुबली 2 ने एक नवा इतिहास लिहिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याआधी ‘दम मारो दम’, ‘डिपार्टमेंट’ आणि बेबीसारख्या चित्रपटांमध्ये ही त्यांने भूमिका केली आहे. राणा दग्गुबाती हॉलिवूडमधील सायन्स फिक्शन सिरीज ‘स्टार वार्स’चे निर्माता जॉज लुकास आपले प्रेरणास्थान मानतो. त्याचे घर पाहण्याची राणाची फार इच्छा आहे.