नरेंद्र मोदी २०१४ प्रमाणे २०१९ च्या निवडणुकीला ५ ,८२७ सभा घेणार का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या राजकीय गल्ल्यांमध्ये सध्या मोठ्या युद्धापूर्वीची निरव शांतता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्या पासून या राजकीय गल्ल्या गाड्यांच्या ताफ्यांनी आणि पांढऱ्या वेशातील लोकांनी फुलून जाणार आहेत. कारण अवघ्या दिड महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीला आता भाजप सामोरे जाण्यासाठी रणनीती आखून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून अंमलात आणत आहे. तर तिकडे काँग्रेसच्या गोटात अद्याप विजयाच्या मांडव झळा उतरलेल्या नाहीत.

मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले तेव्हा

१३ सप्टेंबर २०१३ रोजी नरेंद्र मोदी यांना गांधी नगर वरून दिल्लीला बोलावून घेतले आणि भाजपने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची घोषणा करून टाकली. भाजपच्या नेत्यांनी वेळेचा थोडाही अपव्यय नकरता अवघ्या ४८ तासात मोदींच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आखला आणि नरेंद्र मोदींनी हरियाणाच्या रेवाडी लोकसभा मतदार संघात पहिली सभा घेऊन काँग्रेसवर प्रहार चढवला. तो दिवस होता १५सप्टेंबर २०१३ चा.

मोदी अशी करणार लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात
नव्या वर्षाच्या आरंभी ४ जानेवारी २०१९ रोजी नरेंद्र मोदी आसाम राज्याच्या  बराक घाटी मधील सिलचर येथून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आरंभणार आहेत. त्यांच्या या सभेची तयारी आसाम भाजपच्या वतीने केली जात असून या ठिकाणी आसाम भाजपला मोठे शक्ती प्रदर्शन कण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप पाच राज्यात झालेल्या अनपेक्षित पराभवाच्या धक्यातून अद्याप सावरलेली नसताना भाजपच्या गोटात मात्र नेतृत्वाने लोकसभेच्या प्रचाराचा कार्यक्रम आखण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जातीने या सर्व कामाकडे लक्ष घालत आहेत असे सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून स्पष्ट झाले आहे.

२०१४च्या निवडणुकीत मोदींनी घेतल्या होत्या ५ ,८२७ सभा , २०१९ ला किती घेणार ?
नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या विरोधात आलेली असंतोषाची लाट आपल्या खुबीने मोदी लाटेत बदलून घेण्यात यश मिळवले. त्यांच्या नेतृत्व निपुणतेचा दाखलाच त्यांनी समस्त भारतीयांना दाखवून दिला. मोदींनी २०१४च्या निवडणुकीत एकूण ५,८२७ कार्यक्रम केले ज्यात ४३७ विराट सभांचा समावेश होतो. नरेंद्र मोदींनी कश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम अरुणाचल पासून गोवा महाराष्ट्र पर्यत संबंध देशभर या विशाल सभा घेतल्या. निवडक मतदार संघात त्यांच्या दोन महिन्याच्या अंतराने दोन अथवा तीन सभा पार पडल्या यातून त्यांनी हे दाखवून दिले कि तुमच्या शहरात मोदी दोन वेळा येताच म्हणजे तुमच्या शहराची मोदींना खूप काळजी आहे. मोदींच्या प्रचाराचा कार्यक्रम ४ जानेवारीला सुरु होत असून या चार महिन्यात मोदींना एवढे कार्यक्रम घेणे शक्य नाही जेवढे त्यांनी गत निडणुकीच्या वेळी घेतले होते. त्यातच संसदेचे समारोप आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणे हि त्यांना क्रमप्राप्त आहे म्हणून त्यांना निदान अधिवेशन काळात तरी भारत भ्रमंती करणे शक्य होणार नाही. म्हणून मोदींनी २०१४च्या निवडणुकी वेळी केलेली कार्यक्रमाची संख्या आता मोदी या निवडणुकीत मागे टाकतील हि शक्यता दुरापास्त होत चालली आहे.

दरम्यान पाच राज्यात जनतेने भाजपला जरी नाकारले असले तरी भाजपला जनतेचा हा चेक होता. जेणेकरून भाजप आगामी निवडणुकीत चेकमेट होण्यापासून वाचेल. सबब लोकांमध्ये मोदींच्या नेतृत्वाबाबत मोठा विश्वास आहे, जो कि मोदींना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याकडे मार्गस्त करणार आहे. असे असले तरी मोदींनसाठी येती लोकसभा निवडणूक थोडी बिकटच आहे.