ती माफी नाही, खोट्या गुन्ह्यात अडकवू नका…. 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हडपसर विधानसभा मतदार संघातील आमदार योगेश टिळेकर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविवृद्ध ५० लाख रुपये खंडणी मागितल्याबाबत  गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. या प्रकरणात आता खुद्द योगेश टिळेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “खंडणीचा गुन्हा दाखल करण्याआधी आम्ही भेटलो होतो पण मी तक्रार दाखल करू नका म्हणून हात जोडले नाहीत तर खोटा गुन्हा दाखल करू नका, असे मी म्हणालो होतो असे स्पष्टीकरण योगेश टिळेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.
योगेश टिळेकर यांचे स्पष्टीकरण –
टिळेकर म्हणाले, “हा खंडणीचा गुन्हा दाखल होण्याआधी मी त्यांच्याकडे ( रविंद्र लक्ष्मण बराटे ) गेलो होतो. मी त्यांच्याकडे  तक्रार मागे घ्या म्हणून गेलो होतो ही गोष्ट चुकीची आहे. या भेटीदरम्यान मी त्यांना ही सांगितले की, मी आणि माझा परिवार या आमदार पदापर्यंत पोहचण्यासाठी माझ्या आयुष्यातील २२ वर्षे खर्च झाली आहेत. तुम्ही जर खोटा गुन्हा दाखल केला तर माझ्या या राजकीय जीवनाला त्रास होईल. तुमचा  गैरसमज झाला असेल तर तो काढून टाका त्यामुळे तुम्ही माझ्यावरील खोटा गुन्हा माहे घ्या, अशी विनंती टिळेकर यांनी केली. तसेच ज्या ऑडिओक्लिपबाबत  बराटे बोलत आहेत माध्यमांनी ती ऑडिओ क्लिप देखील ऐकवावी  असे निवेदन टिळेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
तक्रारदार रविंद्र लक्ष्मण बराटे यांचा खुलासा –
हडपसर विधानसभा मतदार संघातील आमदार योगेश टिळेकर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविवृद्ध ५० लाख रुपये खंडणी मागितल्याबाबत  गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. त्याचप्रकरणी  तक्रारदार रविंद्र लक्ष्मण बराटे यांनी मोठा खुलासा केला आहे.  याप्रकरणी  तक्रारदार रविंद्र लक्ष्मण बराटे यांचीच चौकशी पोलीस खात्याकडून केली जात असल्यामुळे त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत या खंडणी प्रकरणाबाबत  पुरावे सादर केले.
ऑगस्ट महिन्यात ई व्हिजन टेली एइंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांचे कोंढवा भागात काम सुरु होते. तेव्हा त्यांच्या कामगारांना गणेश कामठे यांनी तुम्हाला या भागात काम करायचे असेल तर तुम्हाला आमदारांना ५० लाखाची खंडणी  द्यावी लागेल. कंपनीचे काम अधिकृत असल्यामुळे त्यांनी खंडणी  न देता काम चालूच ठेवले मात्र त्यांनतर  काही वायर  चोरीला गेल्या. स्वत: बराटे यांनी योगेश टिळेकर यांना फोन केला आणि तुमच्या नावे गणेश कामठे नामक व्यक्ती  ५० लाख रुपयांची खंडणी मागत असल्याचे सांगीतले. त्यानंतर योगेश टिळेकर यांनी मेधदूत  हॉटेल येथे बराटे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान टिळेकर यांनी गणेश कामठे यांना ओळखत नसल्याचे सांगितले . तेव्हा बराटे यांनी पुन्हा खंडणीची धमकी आल्यास मी सरळ पोलिसात तक्रार करेन असे सांगीतले. त्यानंतर गणेश कामठे नावाचे व्यक्ती बरेच आहेत  त्यापैकी कोण ? असे टिळेकर म्हणाले. त्यानंतर पुढे योगेश टिळेकर यांचे भाऊ चेतन टिळेकर यांनी केबल कंपनीच्या मालकांना फोन लावून खंडणीच्या रकमेत तडजोड  करायला लावली.  या सर्व फोनवरील संभाषणाचे ध्वनिमुद्रण करून  केबल कंपनीद्वारा पोलीस स्टेशन ८ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार देण्यात आली.  त्यानंतर दिनांक १२ सप्टेंबर रोजी टिळेकरांना चौकशी करिता पोलीस ठाण्यातून फोन आला. पण त्यानंतर टिळेकर यांनी थेट वाडा होते बिबवेवाडी यथे बराटे यांची भेट घेतली आणि हात जोडून  तक्रार मागे घेण्याकरिता विनंती केली तरी  देखील तक्रार मागे घेतली गेली नाही. म्हणून अधिकाराचा गैरवापर करीत त्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची बदली देखील करण्यात आली. एवढेच नाही तर आरोपींची चौकशी करण्याऐवजी तक्रारदाराचीच चौकशी करण्यात येत आहे. अशी खंत बराटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केली.
मतदार संघात फायबर ऑप्टीकलचे कामे करताना धमकी आणि त्रास देवुन दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी फोनव्दारे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे (सर्व रा. कोंढवा बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी रविंद्र लक्ष्मण बराटे (55, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी फिर्याद दिली असुन पोलिसांनी भादंवि कलम 385,379,427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही गुन्हा दि. 7 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज-कोंढवा रोड परिसरात घडला आहे. फिर्यादी हे इ व्हीजन टेलि इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध पोलिस पोलिस ठाण्याचे इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्‍ती व आय टी आय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते.
दि. 7 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज-कोंढवा रोड या भागात फिर्यादीच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालु असताना आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि त्यांचा हस्तक गणेश कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकचे काम करण्यासाठी वायर तोडणे, चोरून नेणे, धमकी देणे तसेच इत्यादी प्रकारे त्रास दिली. त्यांनी दि. 7 सप्टेंबर रोजी फोनव्दारे 50 लाखाची खंडणी मागितली आहे. फिर्यादीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी सारखा गंभीर गुन्हा भाजपच्या आमदारावर दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.