आजपासून सुरु होतेय जेईई (JEE) परिक्षा, विद्यार्थ्यांनी ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवाव्यात

मुंबई : पोलीसनामा ओनलाइन – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. जेईई म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. देशभरात जवळपास साडे नऊ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी 40 हजारहून अधिक जॅमर आणि तब्बल 9 हजार सीसीटीव्ही कॅमेरे परीक्षा केंद्रांवर लावण्यात आले आहेत.
जेईई ही प्रवेश परीक्षा 8 ते 12 जानेवारी या कालावधीत होत आहे. जेईई परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना नियम खूप कठोर पद्धतीने पाळले जातात. त्यामुळे कोणते कपडे घालावेत, सोबत काय ठेवावं असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतात.
जेईई परिक्षेची वैशिष्ट्ये
– पहिल्यांदाच होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी 1 लाख कॉम्प्युटर वापरले जाणार आहेत.
– परीक्षेची जबाबदारी सीबीएसई ऐवजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएकडे सोपवली आहे.
– 8 जानेवारी ते 12 जानेवारी या काळात परीक्षा होणार आहे. तर निकाल 31 जानेवारीला जाहीर होईल.
– सकाळी 9.30 ते 12.30 आणि दुपारी 2.30 ते 5.30 अशा दोन सत्रात परीक्षा असणार आहे.
परीक्षेला जाताना या गोष्टी लक्षात ठेवा
– मोबाईलसारखं कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत ठेवू नका.
– प्रवेशपत्राची A4 साईज साधी किंवा कलर प्रिंट सोबत ठेवा.
– प्रवेशपत्रावर आहे तसाच पासपोर्ट फोटो सोबत न्या.
– पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, ई-आधार किंवा आधार कार्ड यापैकी एक सोबत ठेवा.
– दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवा.
– पेन आणि पेपर केंद्रावर दिलं जाणार आहे, त्यामुळे ते सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही.
– परीक्षा केंद्रावर दोन तास आधी पोहचणं गरजेचं, परीक्षेच्या 45 मिनिट आधी प्रवेश बंद होणार.
कोणत्याही माहितीसाठी संपर्क
ईमेल – [email protected]
एसएमएस – 7042399521, 7042399525