पत्रकार हत्या प्रकरण ; बाबा राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह राम रहिमला दोषी ठरवण्यात आले होते. आज पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह राम रहिम हा डेरा सच्चा सौदाच्या माध्यमातून करत असलेल्या काळ्या कामावर प्रकाश टाकण्याचे काम पत्रकार रामचंद्र छत्रपती करत होते. त्यांचे एक वृत्तपत्र होते. ते वृत्तपत्र हरियाणा राज्यात आणि विषेत: राम रहिमच्या प्रसिद्धीच्या ठिकाणी प्रकाशित केले जात होते. या गोष्टीचा राग मनात धरून राम रहिमने त्याच्या गुंडांमार्फत पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची हत्या केली होती. दरम्यान पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह राम रहिमला दोषी ठरवले होते. विशेष म्हणजे सुरक्षेच्या मुद्द्यावरून राम रहीमला  न्यायालयात हजर न करता त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खटल्याच्या न्यायालयीन कामकाजात समाविष्ट करून घेण्यात आले होते. या खटल्याच्या दरम्यान न्यायालयात आणि तुरुंगात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  तसेच १७ जानेवारीला या प्रकरणाची शिक्षा न्यायालयाच्या वतीने सुनावण्यात येणार होती. दरम्यान पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पत्रकार रामचंद्र छत्रपती हे आपल्या ‘पूरा सच’ या वृत्तपत्रातून सतत राम रहिमच्या काळ्या कामावर प्रकाश टाकत होते. त्यांनी राम रहिमच्या डेऱ्यात चालणाऱ्या अमानवीय कृत्यांवर प्रकाश टाकल्याने पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या बद्दल मनात राग धरून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हे प्रकरण २००२ साली घडले होते. आज तब्बल १६ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला असून या निकालानंतर रामचंद्र छत्रपती यांच्या घरच्यांनी आनंद व्यक्त केला आहे.