जस्टिन बिबरने केले गुपचूप लग्न ?

वृत्तसंस्था – आपण पाहतो आहे की, सध्या अनेक बाॅलिवूड सेलिब्रेटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये हे लग्नाचे वारे वाहत आहेत. आता बॉलिवूडनंतर हॉलिवूडमधील सेलिब्रेटीदेखील लगीनगाठ बांधत असल्याचं समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बिबरने अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविन (Hailey Baldwin) लग्न केल्याचं सांगण्यात येत आहे.

जस्टिनने इन्स्टाग्रामवर हॅलेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनमुळे या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर या दोघांविषयीच्या चांगल्याच चर्चा रंगल्या अाहेत. ‘माय वाईफ इज ऑसम’ असं कॅप्शन जस्टिनने शेअर केलेल्या फोटोला दिला आहे. त्यामुळे जस्टिनने सर्वासमक्ष हॅलेसोबत लग्न केल्याचं मान्य केलं आहे. या फोटोमध्ये हॅलेने जस्टिनचा हात धरला असून दोघंही आनंदात असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आपल्या गाण्यांनी अनेक तरुणींची मनं जिंकणारा जस्टिन बिबर मे २०१८ मध्ये हॅलेसोबत साखरपूडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनीही गुपचूपपणे कोर्ट मॅरेज केल्याचं समोर आलं आहे. बहामा आयलँडवर जस्टिनने हॅलेला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी हॅलेने तात्काळ जस्टिनला होकारही दिला होता. तेव्हापासून ही जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे.