K.P करतेय ‘या’ अभिनेत्रीची कॉपी

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री कामना पाठक अँड टीव्हीच्या ‘हप्पू की उलटन पलटन’ या आगामी विनोदी मालिकेत चक्क नऊ वस्ताद मुलांच्या आईची भूमिका निभावण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेत योगेश त्रिपाठी हप्पू सिंगची आणि ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपूरी कटोरी अम्माची भूमिका साकारणार आहेत. सोनाक्षीच्या पहिल्या सिनेमात म्हणजेच दबंगमध्ये तिचा जो लूक होता तसाच काहीसा लूक कामनाचा’ हप्पू की उलटन पलटन’ मध्ये आहे. योगायोग म्हणजे कामना प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासारखी दिसते. ती दिसण्यात सोनाक्षी सिन्हा सारखीच दिसत असल्यामुळे तिला सेटवर सोनाक्षी सिन्हा म्हणूनच बोलवले जाते.

सोनाक्षी सिन्हाला फॉलो करणारी कामना पाठक या मालिकेविषयी म्हणाली की , ‘ हप्पूमधील माझ्या राजेश या व्यक्तिरेखेतील प्रत्येक बाब मग ते कपडे असोत, केशभूषा असो की मेकअप… बऱ्याच गोष्टी दबंगमधील सोनाक्षी सिन्हाच्या लुकशी मिळत्याजुळत्या आहेत. राजेश एक बिनधास्त आणि स्पष्टवक्ती स्त्री आहे. सगळे काही मनासारखे व्हावे यासाठी ती नवऱ्याच्या संदर्भातील गोष्टी तशा घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. ती काहीशी खमकी बायको वाटत असली तरी तिच्याशी नीट वागले तर ती प्रेमळ आहे. ‘

‘हप्पू की उलटन पलटन’ या मालिकेत पोलिस अधिकारी हप्पू सिंगची एक वेगळी बाजू आणि त्याला घरी प्रत्ययाला येणारी असंख्य प्रकारची द्विधा मनस्थिती दाखवण्यात येणार आहे. त्याच्या घरी धाडसी बायको, हट्टी आई आणि चक्क ९ मुले आहेत. लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा असणाऱ्या कामनाने प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत अनेक नाटकं केली आहेत.