कंगनाला ‘देसी गर्ल’ सोबत काम करण्याची तीव्र इच्छा

मुंबई : वृत्तसंस्था – झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटात कंगना रानौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या २५ तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि या चित्रपटामध्ये सध्या कंगना खूप बिझी आहे. मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’नंतर कंगनाची ‘विश लिस्ट’ तयार आहे. कंगनाच्या ‘विश लिस्ट’मधील एक गोष्ट खास आहे. त्यानुसार , कंगनाला पुन्हा एकदा देसी गर्ल प्रियांका चोप्रासोबत काम करण्याची इच्छा आहे. याआधी कंगना आणि प्रियंकाने ‘फॅशन’ आणि ‘क्रिश 3’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते.

‘जात’ जन्माने नाही तर जगण्याने सिद्ध व्हावी : डॉ. निशिगंधा वाड 

एका मुलाखतीत कंगनाने ही इच्छा बोलून दाखवली. मी प्रियांकासोबत ‘क्रिश 3’मध्ये काम केले आहे. यात तिने एका सामान्य मुलीची भूमिका साकारली होती. पण माझ्या मते, प्रियांका आणि मी आम्ही दोघी ‘सुपरगर्ल’ आहोत. त्यामुळेचं याच कन्सेप्टवर मला तिच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा आहे. प्रियांका टफ लेडी आहे, मला तिच्यासोबत काम करायला आवडेल, असे कंगना म्हणाली.
मणिकर्णिका चित्रपटाच्या वेळेस दिग्दर्शकाच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कंगनाने आपल्या हाती घेतले. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला पण तोपर्यंत  दिग्दर्शक दुसऱ्या  प्रोजेक्टमध्ये बिझी झाले होते तेव्हा कंगनाने दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली होती. या चित्रपटात कंगनासोबत अंकिता लोखंडेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदी शिवाय हा चित्रपट तामिळ व तेलगू भाषेतही डब करण्यात आला आहे.