मनोरंजन

के आरके ने प्रपोज केले करण जोहरला म्हणाला …

मुंबई : वृत्तसंस्था – के आरके म्हणजेच कमाल आर खान हा नेहमी कुठल्या तरी नवीन वादात सापडत असतो. आता व्हॅलेन्टाई डे औचित्यसाधून के आरके ने चक्क करण जोहरला प्रपोज केले आहे. ‘डियर करण, व्हॅलेन्टाईन डेसाठी माझ्याकडे एकही गर्लफ्रेन्ड नाही. काय तू माझा व्हॅलेन्टाई डे पार्टनर बनशील ? तुझ्या उत्तराची प्रतीक्षा असेल,’ असे ट्वीट केआरकेने केले.त्याच्या या ट्विटवर करणने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही

मात्र,एका युजर्सने त्याची फिरकी घेत त्याला दीपक कलालचे नाव सुचवले आहे. दीपक कलालच तुझ्यासाठी बेस्ट राहील असा सल्ला एका युजर्सने दिला आहे.तर एका युजर्सने केआरकेला ‘बचके रहो भाई,’ अशा प्रकारे सावधही केले आहे.करण जोहरला प्रपोज करणारा के आरकेची सध्या सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

‘बिग बॉस’शो मधून के आरके प्रसिद्धीच्या झोतात आला होता. सध्या के आरके बॉलिवूड चित्रपटाचे रिव्ह्यू देत असतो. आणि बरेच वेळा ट्विटरवर बॉलिवूड स्टार्सला टार्गेट करून चर्चेत राहण्याचा प्रयत्नही करत असतो .

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या