मनोरंजन

लग्नाच्या प्रश्नावर कतरिनाने दिलं असं कॉमेडी उत्तर

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या गेल्यावर्षभरात अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी लग्न करून संसार थाटला  अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा आणि सोनम कपूर यांनी लग्न करून आपल्या आयुष्याची नवीन सुरवात केली. तर काही दिवसापूर्वी आलीय आणि रणबीर कपूरच्या लग्नाविषयी चर्चा रंगल्या होत्या रणबीर कपूरशी लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नावर आलियाने लग्नाचं नंतर पाहू तोपर्यंत छान छान चित्रपट पाहून आयुष्य मजेत घालवा असं उत्तर दिल होत. आता कतरीना कैफलाही लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर कतरिनाने हटके उत्तर दिलं आहे. हे उत्तर कळताच  तुम्हालाही हसू येईल.

आतापर्यंत लग्नाच्या विषयावर कतरिनाने मौन बाळगलं होत पण प्रथमच लग्नाविषयी कतरीना म्हणाली, लग्न तर मलाही करायचे आहे. योग्य वेळ येइल तेव्हा नक्कीच तुमच्या बरोबर शेअर करेन. पण माझ्या बरोबर लग्न करण्यासाठी कृपा करून कोणीतरी थांबा अशा मिश्किलअंदाजात कतरिनाने उत्तर दिल आहे.

कतरिनाने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतल्यावर तिचे नाव सलमान सोबत जोडले होते. त्यानंतर ती रणबीरच्या प्रेमात पडली काहीकाळ रिलेशन मध्ये राहून यादोघांचे ब्रेकअप झाले. सध्या कतरीना सलमानच्या ‘भारत’ चित्रपटामध्ये बिझी आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या