केजरीवाल यांच्या मुलीचे अपहरण करण्याची धमकी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाला अज्ञाताकडून मेल करण्यात आला आहे. या मेलमध्ये केजरीवाल यांच्या मुलीचे अपहरण करण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाला ९ जानेवारीला एक अज्ञात मेल आला होता. मात्र ही बाब गुप्त ठेवण्यात आली होती. हा मेल मिळताच याबद्दल पोलिसांना सांगण्यात आले. त्याची मेलची एक प्रत पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना देण्यात आली आहे.

उत्तरी दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या मुलीच्या सुरक्षेसाठी तिला पोलीस संरक्षण देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तिच्यासोबत एक सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आला आहे.

सध्या पोलीस आलेल्या मेलची तपासणी करत आहेत. तो एक सायबर कॅफेमधून पाठवला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ज्या मेल आयडीवर हा मेल आला त्याचा आता पोलीस तपास करत आहेत.

‘दिल्ली सरकार धमकी देणार मेल आम्ही पोलिसांना पाठवला आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत.’ असे एका सरकारी अधिकाºयाने म्हटले आहे.